

स्वयंप्रेरणा विषयी काही माहिती
व्यक्तीच्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्याचा उद्देश समोर ठेवून ०७ जुलै २००७ मध्ये स्वयंप्रेरणा संस्थेची स्थापना करण्यात आली.मुख्यत्वेकरून कोचिंग, कौन्सलिंग, ट्रेनिंग आणि कन्सल्टन्सीच्या क्षेत्रात आम्ही कार्यरत आहोत. गेल्या पंधराहून अधिक वर्षात संस्थेच्या माध्यमातून आम्ही शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात विविध नवोपक्रम राबवित आहोत.व्यक्तीला 'स्व' ची ओळख झाली की स्वतःमधील अमर्याद क्षमतांची जाणीव आपोआप होते यावर आमचा विश्वास आहे.
समाज विधायक,सकारात्मक आणि विवेकशील विचारांची पेरणी करीत कृतिशील, आत्मविश्वासू आणि स्वाभिमानी तरुणांची फळी भारतभर उभी करणं हाच 'स्वयंप्रेरणा'चा मूळ उद्देश आहे. आजवर संपुर्ण महाराष्ट्रात,महाराष्ट्राबाहेर आणि भारताबाहेरही विविध देशात 'स्वयंप्रेरणा'च्या विविध उपक्रमातून सशक्त आणि प्रेरणादायी विचार पोहचवण्याचे काम आम्ही केले आहे.युवापिढीचे प्रबोधन,परिवर्तन आणि व्यवसायाभिमुख मानसिकता यासाठी विविध सेमिनार्स, कार्यशाळा, शिबिरे, व्याख्याने अशा माध्यमातून सकारात्मकतेचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम आम्ही करीत आहोत.आमच्या उपक्रमांशी जोडून घेण्यासाठी आपण आम्हाला संपर्क करू शकता.

VISION
लोकांना उज्वल यशासाठी स्वयंप्रेरित करून त्यांचे जीवनमान अधिकाधिक सुकर, आनंददायी आणि समृद्ध बनविणे.

स्वयंशिस्त

स्वसुधारणा

सामाजिक भान

सहकार्य व समानुभूती

दिनेश आदलिंग
संस्थापक व मुख्य प्रवर्तक ,स्वयंप्रेरणा

ज्योती कांचन
मॅनेजिंग डायरेक्टर, स्वयंप्रेरणा